Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर नारायण राणेंना पोलिसांनी केली अटक


संगमेश्वर : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे . नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं . त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता . मात्र , नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला . त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेतलं आहे .

दरम्यान राणेंकडून पोलीसांना अटक वॉरंटची मागणी करण्यात आली . मात्र पोलीसांनी अशा प्रकारचं अद्याप वॉरंट दाखविलेलं नाही . त्यामुळे गेल्या अर्धातासापासून राणे आणि पोलीस संगमेश्वर येथे एका खोलीत बसून आहेत . बाहेर कार्यकर्ते आणि पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत . याबाबत बोलताना राणे यांच्या वकील म्हणाले पोलीसांवर दबाव आहे . पोलीसांकडे साधे अटक वॉरंट नाही . एका केंद्रीय मंत्र्याना अटक करायला जाताना पोलीसांकडे साधे अटक वॉरंट असू नये का असा सवालही प्रमोद जठार यांनी केला . मंत्री राणे यांनी असा काय मोठा गुन्हा केलाय ? की त्यांना अटक करायची आहे . हे कायद्याचे राज्य आहे . आम्ही आता हायकोर्टात धाव घेतली आहे .
दरम्यान राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक या ठिकाणी दाखल झाले आहे . त्याचा ब्लडप्रेशर आणि शुगर वाढल्याचे सांगितले जाते . परंतु आता राणे यांच्या अटकेची पूर्ण तयारी महाराष्ट्र शासनाकडून झालेली दिसत आहे .

पोलीस फोर्स वापरून अटक करा दरम्यान राणे यांच्याकडून अटक वॉरंटची मागणी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना फोन केला . त्यावेळभ परब यांनी पोलीस फोर्स वापरून त्यांना अटक करा , असे सांगितले . सदरील आदेशाची व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहे .

Exit mobile version