Site icon लोकाशा-बंब न्यूज

घरात घुसून महिलेवर अत्याचार, केज ठाण्यात गुन्हा दाखल

केज दि .23 – तू शेतात ट्रॅक्टर का जाऊ दिले नाही असे म्हणत एका 30 वर्षीय महिलेच्या घरात घुसून बळजबरीने अत्याचार केला . तर आरोपीच्या भावाने व वडिलांनी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज शहरात 22 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी तिघा बापलेकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . धारूर तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय पीडित महिला ही केज शहरात वास्तव्यास असून ती 22 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी एकटीच होती . याचवेळी आरोपी संदीपान विश्वनाथ चौरे ( रा . चिंचपूर ता.धारुर ) हा तिच्या घरात जबरदस्तीने घुसला . त्याने तू परवाच्या दिवशी माझे ट्रॅक्टर शेतातून जाऊ का दिले नाही असे म्हणत महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला . महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने महिलेच्या गालात चापटा मारुन अत्याचार करुन निघून गेला . त्यांनतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आरोपीचा भाऊ सुखदेव विश्वनाथ चौरे व त्याचे वडील विश्वनाथ निवृती चौरे हे दोघे पीडितेच्या घरी गेले . त्यांनी तु तुझ्या दिराला संदीपान चौरे याने बलात्कार केल्याचे का सांगितले . तु जर संदिपानचे नाव घेतले तर तुला व तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाहीत . तु संदिपानचे नाव घेवु नको नाही , तर आम्ही तुझे का करायचे ते बघुन घेतो असे अशी जिवे मारण्याची पीडित महिलेला धमकी दिली . अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरुन संदीपान चौरे , सुखदेव चौरे , विश्वनाथ चौरे या तिघा बापलेकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पिंक पथकाच्या फौजदार सीमाली कोळी ह्या करीत आहेत .

Exit mobile version