Site icon लोकाशा-बंब न्यूज

सिरसाळा पोलिसांनी उघडे केले दुचाकी चोरट्यांचे रॅकेट



सिरसाळा, दि. 22 (लोकाशा न्यूज) : सिरसाळा पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीचे वाढते प्रकार हा पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय झाला होता. त्या अनुषंगाने सिरसाळा पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीच्या तपासाचे एक अभियान राबवण्यात आले होते. त्यानुसार गोपनीय पद्धतीने कामकाज सुरु होते. त्या कामकाजाला यश आले असून मोटार सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. चोरी होत असलेल्या मोटारसायकलींबाबत तांत्रीक व खबरींच्या माध्यमातून तपास सुरु होता.
मिळालेल्या माहितीच्या आधारे  सर्वप्रथम 21 रोजी आरोपी सय्यद समीर नोमान रा परळी,अशोक रमेश गायकवाड, रा. सिरसाळा या दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एकूण 24 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवून मोटार सायकल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की 25/2/2021 रोजी फिर्यादी बापूसाहेब अश्रुबा झोडगे रा सुकळी यांनी त्याची मोटारसायकल इरिगेशन कॉलनी औरंगपुर रोडवरून चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती सदर तक्रार च्या अनुषंगाने सिरसाळा पोलिसांनी गुप्त खबरी मार्फत चोरट्यांचा शोध घेतला असताना वरील  आरोपी कडून एकूण 24 मोटार सायकल मिळून आल्या आहेत व ते मोटार सायकल परळी, माजलगांव, दिंदृड, वडवणी, पाथरी, गंगाखेड, उदगीर या ठिकाणावरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे यातील दोन आरोपींना आज न्यायदंडाधिकारी परळी यांच्या समोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर आरोपी कडून कष्ठडी दरम्यान आणखी चोरीच्या मोटार सायकल व इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिरसाळा पोलिसांना विश्वास आहे सदरील वरील कामगिरी सिरसाळा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय महेश विघ्ने, पो ना अंकूश मेंढके,अर्शद सय्यद,जेटेवाड,देशमुख, आर मिसाळ,यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान सिरसाळा पोलीसांनी एकूण 24 मोटार सायकल ची चेसी इंजिन नंबर सह यादी प्रसिद्ध केली आहे.

चौकट
ज्यांची कोणाची असेल त्यांनी चेसी नंबर ओळखून मूळ कागदपत्रे सह सिरसाळा पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा असे, असे सिरसाळा ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदिप एकशिंगे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version