Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताईंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पाली गटातील युवकांचा भाजपामध्ये प्रवेश

{damoYH$m§_wio

बीड प्रतिनीधी

राज्यात जनमताचा कौल डावलून, तत्व अणि नैतिकतेला तिलांजली देऊन एकमेकांचे तोंड न पाहणाऱ्या राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करुन जनतेला हताश केले. आज राज्यात विकासाला प्राधान्य राहीले नाही. केवळ स्वहीतासाठी स्थापन झालेल्या सरकारमुळे राज्यातील आर्थिक परिस्तिथी बिकट झाली. करोनाच्या नावाखाली संपुर्ण विकास ठप्प झाला. बीड मध्येही सत्तांतर झाले. परंतु विकास कामात परिर्वन नाही. सत्ताधारी प्रतिनिधी लोक जनहीतां पेक्षा स्वहीतात मग्न आहेत. बीड मतदार संघाची अवस्था दयनीय असून विकासाचा वाली कुणीही राहीला नाही. राजकीय परिर्वतनामुळे जिल्ह्यात राजकीय दारीद्रय अनुभवास येत आहे. आज बीड जिल्ह्यातील विकास प्रकियेला खिळ बसली. तत्कालीन पालक मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने करोडो रुपयाचा निधी मिळाला. गाव खेड्यापर्यंत विकास कामे पोहचली. मात्र आज बीड मधील सत्ताधारी लोक प्रतिनिधी नवीन रस्ता पुल या सारख्या मुलभुत सुवीधा उपलब्ध करुन देण्यात असमर्थ ठरले आहेत. शहरी असो अथवा ग्रामीण सर्व सामान्य जनता निराश आहे. भविष्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सक्षम सरकार निर्माण करण्यासाठी जनता उत्सुक आहे. असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी आज पाली जिल्हा परिषद गटातील युवकांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश प्रसंगी व्यक्त केला.
आज संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालयात पाली जिल्हा परिषद गटातील मंजरी, कर्जनी, मांडवजाळी येथील युवकांनी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा.राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शना खाली शरद बहीरवाळ मांडवजाळी, मदन धसे मंजरी, दिलीप खटाने कर्जनी ,अशाके खटाने कर्जनी, महेश बहीरवाळ मांडवजाळी ,अनिल बहीरवाळ मांडवजाळी ,सुनील जाधव मांडवजाळी ,आभीषेक बहीरवाळ मांडवजाळी ,विकास बहीरवाळ मांडवजाळी,प्रताप नेहराळे मांडवजाळी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. या वेळी गणेश बहीरवाळ, रवींद्र कळसाने, कृष्णा बहीरवाळ, महेश सावंत, अनिल शेळके, बद्रीनाथ जटाळ, गणेश तोडेकर, सचिन आगाम, नरेश पवार, आदि उपस्थतीत होते.

Exit mobile version