Site icon लोकाशा-बंब न्यूज

मांडवजाळी-बोरवन वस्ती रस्त्यासाठी ग्रामस्थांचे राजेंद्र मस्केंना साकडे, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू- राजेंद्र मस्के

बीड प्रतिनीधी-

बीड तालुक्यातील पाली जिल्हा परिषद गटातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंर्तगत बोरवन वस्तीवर जाण्यासाठी अद्याप रस्ता नसल्याने वस्ती वरील ग्रामस्थांना जीव धोक्यात टाकून बिंदूसरा नदी ओलांडून पायपीट करावी लागते. हा रस्ता करून ग्रामस्थांना रहदारीसाठी रस्ता उपलब्द करुन द्यावा आशी मागनी येथील गावकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना केली आहे.

आज बोरवन वस्तीयेथील राम बहीरवाळ यांच्या घराच्या वास्तुशांतीसाठी राजेंद्र मस्के बोरवन वस्ती येथे गेले होते. रस्ता नसल्यामुळे मोटर सायकल वरुन बिदूसरा नदीतुन मार्ग काढत त्यांनी वस्ती गाठली. या वेळी गावकऱ्यांनी रस्त्याचे गाऱ्हाने मांडले. आडीचशे ते तीनशे लोक संख्या असलेली ही वस्ती. रस्ता नसल्यामुळे येथील वयोवृद्ध गावकरी शाळकरी मुले व महीलांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात हाल अपेष्टा जास्त सहन कराव्या लागतात. तात्काळ वैद्यकीय उपचारांसाठी मोठे संकट उभे राहते. पायपीट करून आणि नदी ओलांडल्या शिवाय वस्ती वरुन येजा करता येत नाही.

लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील लोकांच्या गरजे नुसार अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांना प्रधान्य देऊन रस्त्याची कामे राजेंद्र मस्के यांनी पूर्ण केली आहेत. बीड वरवटी-भाळवणी-लिंबागणेश हा रस्ता पुर्ण केल्याने डोंगर पट्यातील साधारण पंधरा गावांना वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ता उपलब्ध करुन दिल्याने. या परिसरातील ग्रामस्थानी समाधानी आहेत. यांच पद्धतीने बोरवन वस्ती  रस्त्याची  समस्या राजेंद्र मस्के यांनी सोडवावी  अशी भावना लोकांनी व्यक्त केली. साधारन एक किलो मीटर लांबीचा हा रस्ता केवळ पाठ पुरावा नसल्याने दुर्लक्षीत राहीला आहे. येथील गावकऱ्यांची समस्या पुर्ण करण्यासाठी आपण जिल्हा परिषद अथवा शासनाच्या इतर योजनेत हा रस्ता समाविष्‍ट करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी गावकऱ्यांना दिला आहे. या वेळी राम बहीरवाळ, शाहदेव महाराज बहीरवाळ, त्रिंबक नैराळे, राधा किसन कदम, रविंद्र कळसाने, रामदास कदम, गजानन बहीरवाळ, महेश बहीरवाळ, बद्रिनाथ जटाळ आदि उपस्थती होते.3 Attachments

ReplyReply to allForward

Exit mobile version