Site icon लोकाशा-बंब न्यूज

खाकीत खांदेपालट, पीएसआय मनीषा जोगदंड, बप्पासाहेब झिंजुर्डे यांची औरंगाबाद ग्रामीण तर युवराज टाकसाळ यांची जालन्याला बदली

गेवराई दि .१ ९ ( लोकशा न्युज) राज्यात पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरुच असल्याने आता गेवराई तालुक्यातील तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी काढले आहेत.मंत्रालयातील पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर औरंगाबाद परिक्षेत्रातील प्रलंबित बदल्यांना बुधवारी मुहूर्त लागला.त्यामध्ये तालुक्यातील तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी काढून पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड यांची औरंगाबाद ग्रामीण या ठिकाणी तर उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांची बदली जालना जिल्ह्यात आणि चकलंबा पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंजुर्डे यांची औरंगाबाद ग्रामीण या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे .

Exit mobile version