नेकनूर दि .18 : बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, बीडमधील तरुणाने एका अकरा वर्षीय चिमुकलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . सदरील घटना मंगळवारी ( दि .17 ) बीड तालुक्यात घडली . या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
विक्रम भगवान पवार ( वय 24 रा.विद्यानगर , बीड ) असे आरोपीचे नाव आहे . पीडितेच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला शेतात नेऊन अत्याचार केला . या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 376 ( अ ) ( ब ) भादवी सह कलम 3 , 4 पोस्कोसह कलम 3 ( 2 ) ( 5 ) अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विजय लगारे हे करत आहेत .