अवघ्या महिनाभरापुर्वी लग्न झालेल्या नवविवाहीतेचा मृतदेह मंगळवार सतरा ऑगस्ट रोजी विहीरीत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असुन हि घटना पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाणे हद्दीतील चिखली येथे घडली असुन विहीरीत मृतदेह आढळून आलेल्या नवविवाहितेचे माहेरचे नाव हे मनिषा बाबासाहेब शिंदे असुन वय वर्षे अंदाजे 20 रा .चिखली असे आहे या घटनेची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख एपीआय शामकुमार डोंगरे ,सहाय्यक फौजदार आप्पासाहेब सानप ,हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
चिखली येथे विहीरीत मृतावस्थेत आढळलेल्या नवविवाहीतेचे नाव हे मनिषा बाळासाहेब शिंदे हिचे असुन ति पंचमीच्या सणासाठी माहेरी चिखली येथे आई वडीलांकडे आली होती विहीरीवर पाणी भरण्यासाठी ति गेली होती अशी खबर मनिषा हिचे चुलते यांनी अंमळनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. सदरील विवाहीतेचे अवघ्या महिना भरापुर्वी बीड सांगवी येथील युवकाशी लग्न झाले होते.
पंचमीसाठी हि मनिषा शिंदे हि नवविवाहिता हि चिखली येथे माहेरी आपल्या आई वडीलांकडे आली होती मयताचे वडील बाळासाहेब शिंदे यांना दोन मुली व एक मुलगा आहे यात मनिषा हि दुसऱ्या नंबरची होती या प्रकरणाचा पुढील तपास हा अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असुन घटनास्थळी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अंमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे व सहाय्यक फौजदार आप्पासाहेब सानप यांनी अथक परिश्रम घेतले होते.
पंचमीच्या सणासाठी माहेरी आलेल्या नवविवाहीतेचा विहीरीत आढळला मृतदेह
