बीड, दि. 14 : खाकीमध्ये असे अनेक अधिकारी आहेत जे की त्या अधिकार्यांना पोलिस विभाग कधीच विसरणार नाही, कारण त्यांच्याकडील चाणक्य पणामुळे मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यास खाकीला सातत्याने यश आलेले आहे आणि येणार्या काळतही येणार आहे. बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत हेही तपास कामात चाणक्य आहेत. त्यांच्यामुळे बीड जिल्ह्या पोलिस दलाला अनेक गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यास खर्या अर्थाने यश आले आहे. पोलिस खात्यामध्ये आल्यापासून त्यांनी आपले प्रत्येक काम धडाडीने आणि चोखपणे केलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या कामाचा नेहमीच वरिष्ठांनी गौरवही केलेला आहे. राऊत यांनी यापुर्वी बीडच्या दरोडा पथकातही मोठी भुमिका बजावलेली आहे. बीडबरोबरच त्यांनी उस्माणाबाद याही ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे. त्यांचे कामच असे आहे की बीड जिल्हा त्यांची कार्यकिर्द कधीच विसरू शकणार नाही, कालावधी पुर्ण झाल्यामुळे त्यांनी बदलीसाठी विनंती केली होती, त्यानुसार त्यांची बदली मुंबई एसीबीच्या विभागात झाली असल्याचे समजते.