Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन उठवला, जिल्हाधिकारी शर्मा यांनी काढले आदेश


बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी असलेला विकेंड लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. आज दि. 15 ऑगस्टपासून सर्व व्यापारी दुकाने सोमवार ते रविवार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शनिवारी नवे आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, जिल्ह्यात खुली अथवा बंदिस्त उपहारगृह आसन व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील, हे उपहारगृह/बार सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील, शिवाय जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने, सर्व शॉपिंग मॉल हे देखील रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. जीम, योग सेंटर, सलून पन्नास टक्के क्षमतेने रात्री दहापर्यंत सुरू राहतील, शासकिय/निमशासकिय कार्यालये सुरू राहतील, खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये चोविस तास सुरू ठेवण्यास मुभा असेल, जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने हे स्थानिक प्राधिकरणारनाने विहीत केलेल्या नियमानुसार सुरू राहतील…

Exit mobile version