Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा,पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे

परळी ।दिनांक १४।
ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी लातूर कडे जाताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यात जागोजागी थांबून परळी मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या, व्यथा जाणून घेतल्या. पावसा अभावी सध्या पिकांचे होत असलेले नुकसान आणि पीक विमा मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचेकडे गाऱ्हाणे मांडले.

पंकजाताई मुंडे हया आज सकाळी परळीहून लातूरकडे जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात ठिकठिकाणी त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. वरवटी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.पावसाअभावी हाताशी आलेले पीक जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी त्यांचेकडे चिंता व्यक्त केली. तसेच पीक विम्याबाबत ही यावेळी शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले.यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. वरवटी नंतर पिंपळा धायगुडा, शेपवाडी, अंबाजोगाई, वाघाळा, राडी, सायगांव, सुगांव, भारज, बर्दापूर आदी मतदारसंघातील गावच्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. सर्व ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
••••

Exit mobile version