अंबाजोगाई, दि. 13 (लोकाशा न्यूज) : कामाच्या बहाण्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अंबाजोगाईला आणून तिच्यावर अत्याचार केले. यातून ती पीडिता गर्भवती राहिली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणातील अल्पवयीन पीडिता केज तालुक्यातील आहे. वाल्मिक बलभीम जाधव (रा. मोहनगीरवाडी, ता. बीड) हा मार्च महिन्यात सदरील पिडीतेस कामानिमित्त अंबाजोगाई येथे घेऊन आला. 1 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत त्याने अंबाजोगाई शहरालगतच्या साकुड रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन पिडीतेशी बळजबरीने संबंध ठेवले आणि वारंवार तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली. या अत्याचारा बाबत माहिती मिळाल्यानंतर पिडीतेच्या वडिलांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली. सदर ताकारीवरून वाल्मिक बलभीम जाधव याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मोनाली पवार करत आहेत.
अंबाजोगाईत 14 वर्षीय मुलीवर बलात्कार, शहर ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
