राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाकडून जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.
या प्रवेश प्रक्रियेला उद्या 14 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे. अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थ्यी स्वत:चा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करुन रजिस्ट्रेशन करु शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राऊंड 22 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील इयत्ता अकरावी प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती देताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही ट्वीट केले आहे.
अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून होणार सुरु! 22 ऑगस्टपर्यंत पहिला राऊंड, शिक्षण विभागाची माहिती
