Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडेंच्या प्रमुख उपस्थितीत उद्या लातूरात ओबीसी व भटक्‍या विमुक्‍तांचा महामेळावा

लातूर । दिनांक १३।
कायद्यानं मिळालेलं आरक्षण राज्य सरकारच्या दूर्लक्षामुळे रद्द झालं याबाबत ओबीसी इतर मागासवर्गीयात जनजागृती करण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण परत मिळवून घेण्यासाठी उद्या १४ ऑगस्ट रोजी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी भटक्या विमुक्त जातीचा महाजागर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मराठा,ओबीसी समाजाला मिळलेले आरक्षण राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारने न्‍यायालयात व्‍यवस्थित बाजू मांडली नसल्‍याने रद्द झाले. घटनेने दिलेले ओबीसीच्‍या हक्‍काचे आरक्षण सन्‍मानाने परत मिळावे यासाठी आणि आरक्षणाबाबत जनजागृती व्‍हावी याकरीता लातूर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने 14 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या महाजागर महामेळाव्याचे उद्घाटन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री प्रभु चव्हाण, माजी मंत्री राम शिंदे, आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.अतुल सावे,भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार,भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, आ.तुषार राठोड, आ.अभिमन्यु पवार,भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदअण्‍णा केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
         
लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय बार्शी रोड जुनी रेल्वे लाईन याठिकाणी होणाऱ्या या महाजागर महामेळाव्यास ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीतील समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, भाजपा ओबीसी मोर्चाचे कोषाध्यक्ष गोविंद चिलकुरे, मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले जिल्हाध्यक्ष बापुराव राठोड जिल्हा प्रभारी गोरोबा गाडेकर यांच्यासह अनेकांनी केले आहे.
••••

Exit mobile version