बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : आपल्या कुळाचा, घराण्याचा वंश आणि वारसा हा फक्त मुलगाचं चालवू शकतो. अशा धांदाड विचारांनी आणि बुरसटलेल्या मानसिकतेने ग्रासलेले लोक, कधी काय करतील? याचा नेम नाही. असाच काहीसा किळसवाना, संतापजणक प्रकार बीड जिल्ह्यातील कड्यात घडला आहे. पोटच्या मुलाला मुल होणार नाही हे माहिती झाल्यानंतर, वंशाला दिवा पाहिजे ही मागणी करत, चक्क सासू-सासर्याने सुनेला मारहाण करून, भावाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास महिलेला भाग पाडलं. नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. सदर पिडीता पाच महिन्यांची गरोदर असून तिला नवर्याने घरा बाहेर काढले, जात पंचायतनेही बेदखल केले आहे, यासंदर्भात पिडीतेने गुन्हा नोंदवला आहे, एका बाजूने असे असले तरी अद्याप या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही, त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना तात्काळ गजाआड करावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मराठवाडा समन्वयक अॅड प्रज्ञा खोसरे यांनी केली आहेे.
कड्यातील घटना माणूसकीला काळीमा फासणारी, आरोपीला तात्काळ गजाआड करून पीडितेला न्याय द्या, अॅड प्रज्ञा खोसरे यांची मागणी
