बीड (प्रतिनिधी) : आमदार संदिपभैय्या क्षिरसागर यांनी वेळोवेळी सुचना करुन देखील तहसिलदार वमने यांनी बैठकीला जाणिवपूर्वक विलंब केला. पुन्हा आमदार साहेबांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या कानावर हा विषय घातला. जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी व लेखी आदेशात तातडीने प्रतिमाह बैठक बोलवा म्हणून आदेशीत केले. पण गेंडयाची कातडी पाघरलेल्या तहसिलदार वमने यांनी मिटींग घेण्यासाठी विलंब केला. काही काळानंतर बैठक बोलावली पण डोंगर पोखरला आणि उंदिर निघाला या युक्तीप्रमाणे जवळपास पाच हजार अर्जापैकी फक्त 67 अर्ज मंजूर करुन विधवा, अपंग,निराधार,वंचितांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या तहसिलदार वमनेला शासकीय सेवेत कर्तव्यात कसुर केल्याद्दल सेवेतून कार्यमुक्त करा अशी मागणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर यांनी केली आहे.
आम्ही संघर्ष चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आमदार संदिपभैय्या क्षिरसागर यांनी आमच्यावर संजय गांधी निराधार अनुदान योजना अध्यक्ष पदाची व सदस्य पदाची जबाबदारी दिली. आमची निवड झाल्यानंतर संजय गांधी निराधार योजना कार्यालयात सुसूत्रता आणत अनागोंदी पडलेले अर्ज तेथील स्टाफच्या सहकार्याने व्यवस्थीत करत रात्रदिवस आम्ही काम केले. कोरोनाच्या काळात मी व आमचे कमिटी सदस्यांनी जवळपास पाच ते सहा हजार अर्जावर स्वाक्षरी करत तहसिलदार वमने समोर मांडले. पण त्यांनी मात्र अर्ज निकाली काढण्यासाठी खूप विलंब केला. अध्यक्ष व कमिटी सदस्यांशी त्यांनी कधीही विश्वासात घेऊन चर्चा केली नाही. आम्ही त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला. परंतु आम्ही अपरिचत असल्यासारखे त्यांची आमच्या बरोबर वागणूक होती. एकदंरीत अपनामास्पद वागणूक त्यांनी आम्हाला आजतागायत दिली. झालेल्या बैठकीत त्यांनी पाच हजार अर्जापैकी श्रावणबाळ सेवा योजनाचे शहरातील 4 आणि ग्रामीणचे 8 आणि संजय गांधी निराधार योजनेचे शहरातील 27 आणि ग्रामीणचे 28 अर्ज मंजूर केले. ही एक प्रकारची अपंग,विधवा, निराधार, वंचिताची कूचेष्टाच त्यांनी केली आहे. मिटींग झाल्यानंतर अडीच महिन्यानंतर प्रोसेडिंगवर सहया त्यांनी करुन आम्हाला ही माहिती दिली. तेव्हा आश्चर्याचा धक्काच आम्हाला बसला आहे. एक दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना पण पन्नास पेक्षा जास्तीच्या स्वाक्षऱ्या कराव्या लागत असतील आणि तहसिलदार वमने यांनी अडीच महिन्याच्या कार्यकाळात फक्त 383 फाईल पाहिल्या व 67 फाईल मंजूर केल्या. अशा निष्क्रीय तहसिलदार वमनेला कर्तव्यात कसुर केल्यामुळे सेवेतून कार्यमुक्त करा अशी मागणी आम्ही करत आहोत.
तसेच आम्ही प्रोसेडिंवर पण सहया केल्या नाहीत याचे कारण असे आहे की,2016 पासूनचे प्रलंबित अर्ज आम्ही सर्व कमिटीने 2018 पर्यंतचे निकाली काढले आणि तहसिलदाराने 5000 ते 6000 हजार अर्जापैकी फक्त 67 मंजूर केले तर बाकी सर्वांवर अन्याय होईल मग हे मंजूर झालेले जाहिर कसे करावेत? राहिलेल्या गोर-गरीब, निराधार, अपंग,विधवा, परितक्त्या यांचा रोष कोणी घ्यायचा? हे पाप तहसिलदार वमने तुमचे आहे. तुम्हीच याचे उत्तर द्या असा खणखणीत सवाल देखील भाऊसाहेब डावकर यांनी केला आहे.
उद्याच्या बैठकीवर बहिष्कार
तहसिलदार वमने यांनी दि.12/8/2021 ला संजय गांधी, श्रावण बाळ योजनेची बैठक बोलावली आहे. त्यावर भाऊसाहेब डावकर म्हणाले की, तहसिलदार आम्हाला वेडयात काढत आहेत. त्यांच्या सेवेतील बैठकीचा कोरम पूर्ण करण्यासाठी बैठक आंमत्रित त्यांनी केले आहे. दि.04/06/2021 च्या बैठकीतील 5 ते 6 हजार अर्ज आमच्या कमिटीच्या सहयानिशी तहसिलदाराच्या टेबलवर आहेत. त्यापैकी 67 फाईल मंजूर केल्या, बाकी फाईलचे काय केले याचे उत्तर त्यांनी द्यावे. मग हा बैठकीचा नसता उद्योग कशासाठी? असा सवालही डावकर यांनी केला आहे. दि.12 च्या बैठकीच्या वेळी तहसिलदार यांना घेराव घालण्यात येईल असेही संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर यांनी सांगितले.
अध्यक्षाचा सज्जड दम
गोर-गरीब, विधवा, अपंग, निराधार, वंचिताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार कोणी करत असेल तर एजंट,किंवा कार्यालयीन कर्मचारी संबंधीताकडे पैशाची मागणी करत असेल तर त्याच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा देखील भाऊसाहेब डावकर यांनी दिला आहे.
आपला विश्वासू,
भाऊसाहेब डावकर
mo.- 9730457171