तलवाडा प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील भेंडेटाकळीतांडा येथील शाळकरी मुलगा संदीप सोपान चव्हाण यांच्या खून प्रकरणात किशोर विठ्ठल लोंढे व अन्य चार जणांच्या विरोधात राजेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादी वरून तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये खुन्हाचा गुन्हा नोंद असून किशोर लोंढे यास अटक केली आहे तर अन्य चार जण फरार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील शाळकरी मुलगा संदीप सोपान चव्हाण वय वर्ष 15 हा शेतीच्या बांधाच्या वादाचा शिकार बनला आहे, बांधाच्या कारना वरून किशोर विठ्ठल लोंढे,भगवान विठ्ठल लोंढे,बाळू विठ्ठल लोंढे,सोमनाथ भगवान लोंढे,आकाश भगवान लोंढे यांच्यात शेतीचा वाद हा पूर्वी पासून होता ,अनेक वेळा त्याचे बांदावरून भांडण झाले होते याच करना वरून वरील आरोपी यांनी संगनमत करून दिनांक 7 ऑगस्ट रोजी जीवे मारून टाकले व पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने उसात फेकून दिले. असा आरोप मयत मुलांच्या नातेवाईकांनी केला असून आरोपीच्या विरोधात तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये कलम 302,201, 143,149, भादवी नुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याप्रकरणी किशोर विठ्ठल लोंढे यास पोलीसांनी अटक केली असून अन्य चार जण फरार आहेत.आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास उपनिरीक्षक सुभाष माने हे करत आहेत.
भेंड टाकळीत शाळकरी मुलाच्या खून, 302 प्रकरणी एक अटक तर चार फरार
