बीड/प्रतिनिधी
लहान मुले कधी काय करतील हे सांगता येत नाही,खेळण्याच्या नादात त्यांचे कुठेच भान राहत नाही,अशीच एक सात वर्ष्याची मुलगी खेळता खेळता तिच्या पोटात एक लोखंडी खिळा गिळला गेला,काही दिवसाने तिला त्रास होऊ लागल्याने तिच्या पालकांनी डॉ ज्ञानेश्वर रुईकर यांच्या रुईकर हॉस्पिटलमध्ये तिला दाखल केले,तपासणी केली असता मुलीच्या छातीच्या डाव्या बाजूला खिळा अडकून इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले तेव्हा तात्काळ डॉक्टरांनी ऑपरेशन करून हा खिळा काढून मुलीचे प्राण वाचवले
बीड येथील पवार दाम्पत्याच्या सात वर्ष वयाच्या मुलीने खेळत असताना,15 दिवसापूर्वी, लोखंडी खिळा गिळला होता.
तो खिळा बाळाच्या छातीमध्ये डाव्या फुफ्फुसात अडकून इन्फेक्शन झाले व बाळास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बाळास डॉ रुईकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले तर डॉक्टरांनी तत्काळ ऑपरेशन करून खिळा काढण्यास सांगितले, पंधरा दिवसअडकून राहिल्यामुळे छातीत पु होऊन डाव्या बाजूस ऑक्सिजन कमी झालेला होता. डॉ.ज्ञानेश्वर रुईकर यांनी धोका पत्करून हा खिळा दुर्बिणीतून ऑपरेशन द्वारे यशस्वी पणे काढला व मुलीचे प्राण वाचले.
यावेळी भुलतज्ञ डॉ. मोराळे यांनी या लहान बाळास भूल देण्याची नाजूक व कठीण प्रक्रिया उत्तम रीतीने सांभाळली.मुलीच्या ऑपरेशन नंतर पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले