बीड : बीड जिल्ह्यात डेल्टा प्लस delta plus variant या घातक व्हायरसने शिरकाव केला आहे. बीडमध्ये डेल्टा प्लसची लागण झालेला एक रुग्ण आढळल्याची माहिती खूद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे rajesh tope यांनी दिली आहे. मराठवाड्यातील औरंगाबादनंतर बीडमध्ये हा रुग्ण आढळला आहे. बीड जिल्ह्यातून गेल्या एक महिन्यात पाच वेळा स्वॅब पाठवले असून आतापर्यंत ५०० नागरिकांची डेल्टा प्लसची तपासणी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत देखील काहीशा प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. गेल्या २४ तासात नव्याने २१६ रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात सध्या एक हजार ७२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. दरम्यान अगोदर कोरोना नंतर म्युकर मायकोसिस आणि आता डेल्टा प्लसचा शिरकाव झाल्याने जिल्हावासीयांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
चिंताजनक! बीड जिल्ह्यात डेल्टा प्लसचा शिरकाव; एक रुग्ण आढळला
