भाजपाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी स्वत:चा वाढदिवस रद्द केल्यानंतर तब्बल पाच दिवस बीड जिल्ह्यात राहुन गेल्या. दरम्यानच्या काळात हजारो लोकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. पण पंकजाताईतल्या र्हदयातली भुमिका प्रत्यक्षात जेव्हा बाहेर पडली तेव्हा या महिला नेतृत्वाच्या मनात जनहितवाद आणि त्यातला चांगुलपणा कशा दडलेला आहे?हा अनुभव लोकांना आला. कोकणात अतिवृष्टी झाली. चिपळुण पाण्याखाली गेलं किंवा दरड कोसळुन तळीए गावची स्मशानभुमी झाली. मग पंकजाताईनं काय केलं? सामाजिक दायित्व निभावणार्या महिला नेतृत्वाला नैसर्गिक आपत्तीचं दु:ख सहन न होण्यापलीकडचं असतं. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत: परळी शहरात त्यांनी मदत फेरी काढली. त्या ठिकाणी लोकांना आवश्यक वस्तु मिळाव्यात म्हणुन मोठी मोठी वाहनं गरजेच्या वस्तुने भरवुन पाठवली. बीड जिल्हा भाजपाला आदेश देवुन ट्रकच्या ट्रक मिळालेली मदत स्वत: रवाना केली. संकटात खारीचा वाटा उचलणारं नेतृत्व आणि तशी दृष्टी जर असेल तर वर्तमान राजकारणात अशा लोकांची गरज आहे. परळीत पाच दिवसाच्या मुक्कामात अनेकांच्या अडचणी ऐकुन घेतल्या. नगर पालिकेच्या तक्रारी असतील किंवा कचरा डेपो असेल यापेक्षा अधिक कोरोनासारख्या संकटात सुख दु:खात त्यांनी अनेकांच्या घरी भेटी दिल्या. सांगण्याचा हेतु हा राजकारणात संधी मिळो अथवा न मिळो समाजकारणाची भुमिका या नेतृत्वाच्या र्हदयातुन पहायला मिळते. म्हणुनच पंकजाताईवर लोक जीवापाड प्रेम करतात. ज्यांना लोकनेता म्हणतात. आजही गर्दीतुन त्यांना स्वत:ला सावरता येत नाही. सत्कार नको म्हटलं तरी प्रेम करणारा कार्यकर्ता हक्काने जवळ येतो. ज्याचं मातृत्व पालकत्वाच्या माध्यमातुन त्यांच्याकडे जपल्या जातं. म्हणुनच त्यांची भुमिका जनहितवादाची आहे. गोरगरीबांच्या कल्याणाची आहे. त्यापेक्षा अधिक वंचित, उपेक्षित वर्गांना न्याय मिळवुन देणारी आहे.
26 जुलै त्यांचा वाढदिवस. मात्र यंदा त्यांनी कोरोना संकट आणि पुरग्रस्तांच्या पार्श्वभुमीवर कुणालाही साजरा करू दिला नाही. 28 जुलै रोजी परळी निवासी आल्या. चार ते पाच दिवस त्यांनी मुक्काम केला. मागच्या काही दिवसापासुन वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांचं नाव चर्चेत आहे. राजकारणातले विरोधक जाणिवपुर्वक काही बातम्या मिडियाला पुरवतात आणि त्यांच्याभोवती फिरवतात. उदा. दिल्ली भाजपाच्या बैठकीचं वेगळं स्वरूप मिडियानं मांडलं. त्याचा खुलासा योग्य पद्धतीने स्वत: पंकजाताईनं करावा लागला. काय तर म्हणे पंकजाताई भाजप सोडणार. खरं तर हा राजकारणात काम करणार्या लोकांचा चक्क बालिशपणा होय. ज्या नेतृत्वाचा राजकिय जन्मच कमळाच्या पाळण्यात झाला, ज्यांचा विचार राष्ट्रवादी आणि जनवाद हा आहे असं नेतृत्व वेगळा विचार कधीच करू शकत नाही. स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा सक्षम वारसा पुढे चालवण्याची कसब करताना संकटाची मालिका अनेक प्रश्न आणि त्यातुन करावा लागणारा संघर्ष पण त्यांचे चार-पाच दिवस केवळ सामाजिक दायित्वाचे लोकांनी पाहिले. अगदी प्रसन्न मुडमध्ये त्या होत्या. कुठल्याही प्रकारचे टेंशन चेहर्यावर नव्हतं. भेटायला आलेल्या प्रत्येकाची आस्थेवाईक चौकशी आणि स्वागत नको म्हटलं तरी कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी प्रसंगी एक पाऊल मागे. चार दिवसाच्या दरम्यान त्या जिथे गेल्या तिथे प्रचंड गर्दी. मागच्या आठवड्यात कोकणात पावसाने धुमाकुळ घातला. चिपळुणसारखं गाव पाण्यात बुडालं. तळीये सारखं गाव नेस्तनाबुत झालं. अशा वेळी एक महिला नेतृत्वाची भुमिका किती जनवादाची असते? याचं स्वरूप बीड जिल्ह्यातील लोकांनी जवळुन पाहिलं. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि अन्य लोकप्रतिनिधीला व कार्यकर्त्यांना पुरग्रस्तासाठी मदत फेरी काढत शक्य तेवढं सामान जमा करा अशा प्रकारच्या सुचना केल्यानंतर बीडसारख्या शहरातुन काही ट्रक सामान जमा झाले. माजलगावातही कार्यकर्त्यांनी मोहिम हाती घेतली. परळीमध्ये स्वत: पंकजाताई केवळ मदत फेरी नव्हे तर शक्य ते सामान देणार्याच्या दारात गेल्या. मग कुठल्याही प्रकारच्या वस्तु असतील तिचा स्विकार केला. नगदी स्वरूपात मिळालेली रक्कम सामानाच्या स्वरूपात मिळालेल्या वस्तु हे सारं त्यांनी टेंपो, ट्रक यासारख्या वाहनातुन बीड जिल्ह्याचा जनतेचा खारीचा वाटा संकटात म्हणुन तिकडे रवाना केला. परळीमध्ये नगर पालिकेच्या कारभाराबाबत काही तक्रारी तथा कचरा डेपोसारख्या स्पॉटची स्वत: पाहणी केली. एकुणच काय प्रत्येकाची निवेदने स्विकारली. प्रश्न समजुन घेतले आणि काही प्रश्न मार्गी पण लावले. निमित्ताने सांगायचं हे एका महिला नेतृत्वाच्या र्हदयात किती जनहितवादी सद्गुणाचा स्वभाव दडलेला आहे. अशा नेतृत्वाची सद्या वर्तमान राजकारणाला गरज आहे. कधी कधी म्हणावं वाटतं पंकजाताईंना जवळुन पाहिल्यानंतर प्रत्यक्ष कृतीचा त्यांचा अनुभव येतो आणि मग हे नेतृत्व साहेबापेक्षा एक पाऊल सरस निर्णयक्षम आहे हे कळुन चुकतं. त्यांच्या डोक्यात नेहमी विकासाचं आणि गरजुंना मदत करण्याचं राजकारण घुसलेलं असतं. वैचारिक पातळी आणि त्या दृष्टीने त्यांची भुमिका जवळुन येते. लोकनेत्याकडे समाजातील सर्वांचं लक्ष असतं. म्हणुन कधी कधी त्यांच्या प्रत्येक भुमिकेला मिडिया लक्ष बनवते. मंत्री गुलाबराव पाटील सहज म्हणुन जातात पंकजाताईंनी शिवसेनेत यावं. शंभुराज देसाई किंवा अन्य कुणी राजकारणात आपआपल्या पद्धतीने आपआपल्या भागात लोकप्रतिनिधी बोलत असतात. पण पंकजाताईच्या डोक्यात नेहमीच सकारात्मक कमळाच्या फुलाच्या पाकळ्या फुललेल्या असतात. त्यांच्या मनालाही दुसरा विचार कधीच शिवणार नाही. राजकारणातले विरोधक उठवत असलेल्या वावड्यांचा सामना त्यांना करावा लागतो. संधी मिळाल्यानंतर कर्तव्य आणि जबाबदारीची जाणिव याची सिद्धता त्यांनी अनेकदा केलेली आहे. संघटनात्मक पातळीवर मध्यप्रदेशातला त्यांचा संपर्क बोलकं उदाहरण आहे. बीड जिल्ह्यात सुद्धा त्यांनी संघटनात्मक पातळीवर लक्ष घालताना प्रशिक्षणासारखे विषय असतील बुथ कमिट्या असतील किंवा विस्तारक असतील अशा एकुणच बाबींचा ऊहापोह प्रमुख पदाधिकार्यांच्या सोबत चार-पाच दिवसाच्या मुक्कामात केला. त्यांना दृष्टी जनकल्याणाची आहे. गोरगरीबांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची आहे. एकीकडे महापुराने संसार उद्धवस्त केले अशा संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावुन जाताना त्यांनी चार दिवसात मदतीचा यज्ञ उभा करून मिळवलेली शिदोरी ही खर्या अर्थाने संचित पुण्याई आहे. लोकांच्या मधुन एक-एक वस्तु तिचा स्विकार केला आणि गरजुंना पाठवला. हे जे सामाजिक दायित्व राजकारणातल्या पलीकडे आहे. हे केवळ भाजपातच पहायला मिळेल हे मात्र नक्की. त्यामुळे पंकजाताईचा चार-पाच दिवसाचा दौरा केवळ पुरग्रस्तांच्या मदतीने चांगलाच गाजला. त्यापेक्षाही अधिक अनेकांच्या घरी भेटी दिल्या. सुख दु:ख यांच्याही गाठीभेटी घेतल्या. परळीसारख्या शहरात अनेक प्रश्नाला नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे. तेही जाणुन घेतलं. त्यांचा स्वभाव कुठल्याही प्रश्नाचं राजकारण करण्याचा नाही. प्रश्न निकाली काढण्याचा आहे. बाकी काही असलं तरी त्यांच्यातला दुरदृष्टीपणा केवळ जनकल्याणाचा जनहितवादी आहे हे मात्र नक्की.
– दखल राम कुलकर्णी