बीड, दि.1 (लोकाशा न्युज)ः- जुन्या वादाच्या कारणावरून पेठबीड भागातील गायकवाड कुटूंबातील चौघांना रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास बेदम मारहाण करण्यात आली.
पेठबीड भागातील सुभाष कॉलीनी येथील मोतीलाल रामचंद्र गायकवाड (वय 45), वर्षा मोतीलाल गायकवाड(वय40), अरूण मोतीलाल गायकवाड (वय22), निकिता मोतीलाल गायकवाड (वय 20) या चौघांना त्यांच्या घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींना पेठबीड पोलीस ठाण्याचे पीआय पाटील यांनी भेट दिली. या मारहाण प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया झालेली नव्हती.
जुन्या वादातून घरात घुसून चौघांना बेदम मारहाण
