Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्हा भाजपातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य रवाना, व्यापारी बांधवांचे योगदान मोलाचे -राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधीआज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे सांगली जिल्ह्यातील देववाडी येथील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक साहित्यांचा टेंपो जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना करण्यात आला.पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात अतिवृष्टी मुळे दरडी कोसळणे आणि महापुराची भयावह आपत्ती निर्माण झाली. लाखो नागरिक विस्थापित झाले.अनेकाचे संसार उध्वस्त झाले. आपत्तीग्रस्त दुःखीतांना मदतीचा हात देण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीड शहरात मदतफेरी काढण्यात आली.या फेरीला व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याने मदत साहित्य जमा झाले. शहरातील व्यापारी आणि दानशूर व्यक्तींच्या योगदानाबद्दल राजेंद्र मस्के यांनी आभार व्यक्त केले. आज जिल्हा पदाधिकारी ,व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राजेंद्र मस्के यांनी झेंडा दाखवून साहित्याचा टेंपो रवाना करण्यात आला.यावेळी अॅड सर्जेरावतात्या तांदळे, नवनाथ अण्णा शिराळे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सविताताई गोल्हार,  विक्रांत हजारी, चंद्रकांत फड, भगिरथ बियाणी, जगदिश गुरखुदे, अजय सवाई, डॉ जयश्री मुंडे, अॅड भगवानराव केदार, डॉ लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, शातीनाथ डोरले, कल्याणराव पवार, विवेक पाखरे, संजय सानप, संतोष ढाकणे, माजी सभापती किरण बांगर, भुषण पवार, बालाजी पवार, संभाजी सुर्वे, दिपक थोरात, पंकज धांडे , नरेश पवार, शरद बडगे, गणेश बहिरवाळ, अमोल वडतीले, विठ्ठल ठोकळ, महेश सावंत, सुरेश उगलमुगले,भारत खरमाटे,वनवे, विजय डरफे, प्रमोद रामदासी, विनायक मुंडे, हरिष खाडे, कपिल सौदा, बंटी भिसे, भास्करराव सालपे, राकेश बिराजदार, दत्ता परळकर, सचिन आगाम, रवींद्र कळसाने, विलास सातपुते, डॉ जयश्री मुंडे,शैलाताई मुसळे,सौ छाया मिसाळ,लताताई राऊत, सौ संध्या राजपूत,सौ शितल राजपूत,कांता बांगर,रमेश शेंडगे, बाळासाहेब गात आदी उपस्थित होते
चौकटलोकशाहीच्या राज्यप्रणालीमध्ये आदर्श विक्रम निर्माण करणारा जनप्रतिनिधी म्हणून गणपतराव देशमुखांची नोंद इतिहासात करावी लागेल. असे गौरवोद्गार काढून जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिवंगत लोकनेते तथा शेकापचे एकनिष्ठ नेते माजी मंत्री, विरोधी पक्षनेते गणपतराव देशमुख यांना आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Exit mobile version