Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता मराठी भाषेतही इंजिनिअरिंगचे शिक्षण,पंतप्रधान मोदींचा निर्णय मराठी भाषिकांसाठी कल्याणकारी -राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी

देशातील काही राज्यात इंजिनिअरिंग चा अभ्यासक्रम मराठी बरोबरच इतर पाच प्रादेशिक भाषांमध्ये शिकवण्याचा निर्णय  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. हा निर्णय मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद व विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी निर्णय ठरणार आहे.

देशातील गोरगरीब विद्यार्थ्यां, मध्यम वर्गातील आणि दलित आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत  इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे. मराठी भाषिक विद्यार्थ्यां मधील सामर्थ्य आणि कौशल्याला सुवर्ण संधी प्राप्त होईल. भारतीय भाषांमध्ये शिक्षणाचा निर्णय कौतुकास्पद आहे.  कल्याणकारी निर्णय घेतल्याबद्दल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी अभिनंदन व्यक्त करत आहे.

29 जुलै 2020 मध्ये देशात प्रथमच  सर्वंकष राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात आले. उच्च शिक्षण घेताना  भाषेचे बंधन  विद्यार्थ्यांवर नसावे, इंजीनियरिंग,कॉमर्स सायन्स अशा ज्ञानाने परिपूर्ण असलेल्या अभ्यासक्रमाचा फायदा  देशातील सर्व भाषिक  विद्यार्थ्यांना व्हावा. हा उदात्त हेतू समोर ठेवून  घेतलेला निर्णय भविष्यात कल्याणकारी ठरणार.  आठ राज्यातील 14 महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. मराठी, हिंदी,तेलगु,तामिळ, आणि बांगला या प्रादेशिक भाषेत देशातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा देशात प्रथमच मोदी सरकारने उपलब्ध करून दिली . इंजिनिअरिंग शिक्षण क्षेत्रात हा ऐतिहासिक निर्णय होय.  क्षमता व पात्रता असूनही

इंग्रजी भाषेच्या दडपणामुळे अनेक विद्यार्थी इंजीनिअरिंग क्षेत्राकडे जात नव्हते. इंग्रजी भाषेला मातृभाषेचा पर्याय मिळाल्याने विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल.

 विद्यार्थ्यांना  उज्वल करीअर घडवण्यासाठी महत्वपूर्ण संधी या निर्णयामुळे उपलब्ध झाली.

Exit mobile version