तलवाडा- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 29 रोजी सायंकाळी तलवाडा येथे घडली या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद तलवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यातील पांचाळेशवर येथील रहिवासी समाधान पाडुळे हा तलवाडा येथील जावाई आहे. समाधान पाटुळे,वय 26 याने तलवाडा जिल्हा परिषद शाळेच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली याप्रकरणी चंद्रकांत साळवे यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे म्हटले की समाधान पाटुळे यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्या केल्याप्रकरणी तलवाडा पोलिस स्टेशन ला आकाशमत मृत्यूची नोंद करण्यात आली असून तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.ना, उध्दव राऊत करीत आहे.
तलवाडा येथील जि.प.शाळेच्या खिडकीला गळफास घेऊन तरुणांची आत्महत्या; परिसरात खळबळ
