Site icon लोकाशा-बंब न्यूज

133 कोटी भारतीयांच्या आशा पल्लवित, उद्या बीडचा अविनाश साबळे ऑलंम्पिकमध्ये इतिहास रचणार!

आष्टी, टोकियो ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आणि भारताला मीराबाई चानू हीच्या माध्यमातून पहिले पदक मिळाले.1952 नंतर प्रथमच स्टीपलचेस स्पर्धेत अविनाश साबळे उतरला आहे.आता अविनाश साबळे समोर केनियन धावपटुंचे विक्रम मोडण्याचे आव्हान उभे आहे. १३३ कोटी भारतीयांचे स्वप्न अविनाश साकारणार का? हे उद्या समोर येणार आहे.

बीडचा भूमिपुत्र धावपटू अविनाश साबळे याने आर्मीमध्ये असताना धावण्याच्या स्टीपलचेस स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या ऑलम्पिक पदकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. उद्या दिनांक ३० रोजी टोकियो ऑलम्पिकच्या स्टेडीयम मैदानावर तीन हिट पार पडणार आहेत. त्यामध्ये १५ खेळाडू असणार आहेत.असे मिळून तीन हिट असणार आहेत.एकूण ४५ स्पर्धक सहभागी असणार आहेत. अविनाश साबळे याचा जागतिक क्रमवारीत 20 वा क्रमांक आहे.
जागतिक रेकॉर्ड हे कतार येथील शाहीन सैफ सईद याने ब्रुसेल्स येथे झालेल्या स्पर्धेत ३००० मीटर अंतर ७.५३.६३ इतक्या वेळात पार केले होते.तर २०१६ मधील रिओऑलम्पिक मध्ये केनिया चा किप्रितो कोन्सोलेस याने ८.३.२८ मिनिटात पार करून रेकॉर्ड केले होते. आता या स्पर्धेत अविनाश समोर केनिया, इथियोपिया, मोरोक्को स्पेन येथील धावपटुंचे आव्हान आहे. सध्या अविनाशचा स्कोर ८.13 पर्यंत आहे. त्यामुळे अविनाश भारताला सहज पदक मिळवून देईल हे निश्चित आहे.

Exit mobile version