बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा स्वागतार्ह निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपुर्वक आभार, केंद्र सरकारचा या ऐतिहासिक निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य सुनिश्चित होणार असल्याचे खा. प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारचा तो ऐतिहासिक निर्णय, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य सुनिश्चित करणारा – खा. प्रीतमताई
