Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडेंच्या सहभागाने परळीत पूरग्रस्तांसाठी जमा झाली मोलाची मदत,मदतफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; अनेक दानशूर सरसावले

परळी ।दिनांक २९।
राज्यातील अतिवृष्टीबाधित व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज शहरातून निघालेल्या भाजपच्या मदतफेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दानशूर नागरिक वस्तू आणि निधीच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र यावेळी पहायला मिळाले.

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदतफेरीला सुरवात झाली. बस स्थानक रोड, एकमिनार चौक, स्टेशन रोड, टाॅवर, गणेशपार आदी प्रमुख मार्गावरून ही मदतफेरी काढण्यात आली. २६ जुलै रोजी पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस होता. राज्यातील विविध भागात पुरामुळे झालेले नागरिकांचे प्रचंड नुकसान लक्षात घेता पंकजाताईंनी केलेल्या आवाहनानुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने शहरातून आज मदतफेरी काढण्यात आली.

पंकजाताई स्वतः सहभागी

पंकजाताई मुंडे या मदतफेरीत स्वतः सहभागी झाल्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वैद्यनाथ काॅलेजचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. फेरी निघाल्यानंतर काही वेळातच मोठी रक्कम जमा झाली तसेच व्यापाऱ्यांनी किराणा साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना दिल्या. ही सर्व मदत एकत्रित ट्रकद्वारे पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे.
••••

Exit mobile version