Site icon लोकाशा-बंब न्यूज

चिंता वाढली; बुधवारी अडीचशेच्या घरात बधितांचा आकडा

बीड : जिल्ह्यात बुधवारी (दि.२८) कोरोनाचा आकडा वाढला असून अडीचशेच्या जवळ गेल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने तिसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत.
मंगळवारी ५००९ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२८) प्राप्त झाले, त्यामध्ये २४१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४७६८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ५०, अंबाजोगाई ५, आष्टी ४४, धारूर १६, गेवराई २९, केज १०, माजलगाव ५, परळी १, पाटोदा ३३, शिरूर ३९, वडवणी ९ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Exit mobile version