बीड प्रतिनिधी
राज्यातील सुमारे नऊ जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे प्रलयंकारी महापूराचे संकट निर्माण झाले. नैसर्गिक आपत्तीच्या आघातामुळे शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर लाखो जणांना स्थलांतर करण्याची वेळ आली. तिळेय आणि चीपळूण येथील अवस्था दारुण आहे.उध्वस्त झालेले संसार आणि विस्कळीत जनजीवनामुळे तेथे फक्त आक्रोश आणि वेदनांची लाट आहे.
उसवल गणगोत सार… आधार कुणाचा नाही…. हा प्रत्यक्ष अनुभव आज पूरग्रस्त बांधव घेत आहेत.
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
पूरग्रस्तांच्या डोळ्यातील आसु पुसण्यासाठी खारीचा वाटा म्हणून बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीने मदत फेरीचे आयोजन केले होते, सजग बिडकरांनी आवाहानाला प्रतिसाद देत मदत साहित्य देवुन मानव धर्माचे पालन केले. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मदत फेरी दरम्यान व्यक्त केली.
या मदतफेरीत अॅड. सर्जेराव तात्या तांदळे, जगदीश भैय्या गुरखुदे, नवनाथ अण्णा शिराळे, प्रा.नागरगोजे,सर, सलीम जहांगीर,चंद्रकांत फड, विक्रांत हजारी, भगीरथ बियाणी, विजयकुमार पालसिंघनकर ,सुनील मिसाळ, गणेश पुजारी, शिवाजी आप्पा मुंडे, डॉ.जयश्री मुंडे, संध्याताई राजपुत,लता बुंदेले,छाया मिसाळ, शैलजा मुसळे,कांता बांगर,लता रावुत,अनिता जाधव,संग्राम बांगर, भुषण पवार,शांतिनाथ डोरले, प्रमोद रामदासी, वसंत गुंदेकर, शरद बडगे ,महेश सावंत, हरीश खाडे, किरण बांगर, पंकज धांडे ,अनिल शेळके, सखाराम सालपे ,नागेश पवार, विलास बामणे, दत्ता परळकर,कपील सौदा, बद्रीनाथ जटाळ,शाम रावुत,देवा दहे अशोक घोलप मामा,आदी सहभागी झाले होते.
चौकट
काल निघालेल्या पूरग्रस्तांच्या मदत फेरीला बीड शहरातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू देवून उत्तम प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद लक्षात घेऊन आज सकाळी 10.30 वाजता बीड शहरात मदतफेरी काढण्यात येणार आहे. नागरिकांनी यथाशक्ती मदत देऊन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.