बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : वाढदिवसाच्या निमित्ताने हार बुके यावर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद म्हणून महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पूरग्रस्त गावकर्यांना मदत करण्यासाठी बाळासाहेब सानप 106 आणि गजानन आंधळे यांनी गावात जाऊन स्थानिकांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे अन्न धान्य पुरवठा केला आहे. त्यांचे पंकजाताईंनी खूप खूप कौतुक केले आहे.
पंकजाताईंच्या एका आवाहनानंतर कार्यकर्ते थेट पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहचले, कार्यकर्त्याचे ताईंनी केले भरभरून कौतूक
