बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी माजलगावच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता गायकवाड यांना पोलीस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या संदर्भातील माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली आहे.
माजलगाव तालुक्यातील सुर्डी येथील एका नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणातील तपासी अधिकारी महिला नीता गायकवाड यांना निलंबित करावे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. यासंदर्भात अनेक शिष्टमंडळांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. अखेर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी महिला पोलिस अधीकारी नीता गायकवाड यांच्यावर शनिवारी निलंबनाची कारवाई केली.
पोलिस अधीक्षकांचा दणका, सुर्डी प्रकरणात पोलिस अधीकारी निता गायकवाड यांच्यावर केली तडकाफडकी निलंबनाची कारवाई
