बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : रायगड जिल्ह्यातील घटना अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी असून याठिकाणी दरड कोसळून झालेल्या जीवितहाणीबद्दल मुंडे भगिणींनी हळहळ व्यक्त केली आहे.
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक पोष्ट शेअर केली आहे, रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे, या दुर्घटनेतील मृतात्म्यांना भावपुर्ण श्रध्दांजली, असे पंकजाताईंनी या पोष्टमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर खा. प्रीतमताई मुंडे यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून जीवितहाणी झाल्याचे वृत्त दु:खत आहे. दुर्घटनेतील मृत नागरिकांना भावपुर्ण श्रध्दांजली ईश्वर त्यांच्या कुटूंबियांना या दुखातून सावरण्यासाठी बळ देवो आणि अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती पुर्व पदावर येवो, असे खा. मुंडे म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यातील घटना अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी, दरड कोसळून झालेल्या जीवितहाणीबद्दल मुंडे भगिणींनी व्यक्त केली हळहळ
