Site icon लोकाशा-बंब न्यूज

सुर्डीतील घटना निंदनीय आणि अंगावर शहारे आणणारी !! पीडित मुलीला तात्काळ न्याय मिळायलाच हवा, एनसीपीच्या अॅड प्रज्ञा खोसरे आणि महिला पदाधिकाऱ्यांनी पीडितेसह कुटूंबियांची भेट घेऊन दिला धीर

बीड, दि. 22 (लोकाशा न्युज) : सुर्डी (ता. माजलगाव) येथील अत्याचाराची घटना निंदनीय आणि अक्षरशः अंगावर शहारे आणणारी आहे, त्यामुळे
पीडित मुलीला तात्काळ न्याय मिळायलाच हवा, असे एनसीपीच्या अॅड प्रज्ञा खोसरे यांनी म्हटले आहे, बुधवारी त्यांनी स्वतः आणि एनसीपीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पीडितेसह तिच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला, घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगत यावेळी खोसरे यांनी पीडित कुटूंबियांचे आणि एनसीपीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्यासोबतही संवाद घडवून आणला.
माजलगाव तालुक्यातील सुर्डी या गावातील नऊ वर्षाच्या मुलीवर शेजारीच राहणाऱ्या एका नराधमाने तिला घरी बोलून तिच्यावर बलात्कार केला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार बुधवारी तिला भेटण्यासाठी बीड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी अॅड प्रज्ञा खोसरे मराठवाडा समन्वयक,सौ वैशाली ताई पाटील बीड जिल्हा निरीक्षक, सौ संगीताताई तूपसागर जिल्हाध्यक्ष बीड, अनिताताई वाघमारे तालुका कार्याध्यक्ष यांनी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्या मुलीची रीतसर चौकशी केली, त्या मुलीच्या आईलाही यावेळी धीर दिला, घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आहे, त्यामुळे पोलिसांनी थोडाही विलंब न करता पीडित मुलीसह तिच्या कुटूंबियांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खोसरे यांनी लावून धरली आहे.

Exit mobile version