Site icon लोकाशा-बंब न्यूज

संकल्प निरोगी बीड अभियानचा, गरजुंनी लाभ घ्यावा – विजयसिंह पंडित,उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

गेवराई दि. २० (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त गुरुवार दि. २२ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे संकल्प निरोगी बीड अभियान राबविण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणार्‍या या उपक्रमात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरोदर माता तपासणी, उपचार व लसीकरण, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप यासह विविध आरोग्य तपासण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील गरजु रुग्णांनी निरोगी बीड अभियानचा लाभ घेण्याचे आवाहन विजयसिंह पंडित यांनी केले. अभियानच्या पुर्व तयारी संदर्भात त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देवुन संबंधितांशी चर्चा केली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत संपुर्ण बीड जिल्ह्यात संकल्प निरोगी बीड अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हायाचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला जिल्हाभर प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली असुन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मंगळवार दि. २० जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे अभियानाच्या पुर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, डॉ. नोमाने, डॉ. जयभाय, डॉ. सराफ, डॉ. आंधळे, नगरसेवक राधेश्याम येवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक आतकरे, तालुका उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अक्षय पवार, मंगेश खरात यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

गुरुवार दि. २२ जुलै रोजी सकाळी १० वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते उपजिल्हा रुग्णालयात अभियानाचा शुभारंभ होणार आहे. गरोदर माता तपासणी, उपचार व लसीकरण, रक्तदान शिबीर, दिव्यांगांची तपासणी आणि प्रमाणपत्राचे वाटप, जिभेवरील शस्त्रक्रिया, असंसर्गजन्य रुग्णांची तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया यासह कोविड संदर्भातील समोपदेशन यासह इतर आरोग्य विषयक तपासण्या या शिबीरामध्ये करण्यात येणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासुन रुग्णांच्या नोंदी घेवुन त्यांची सामान्य तपासणीची प्रक्रिया सुरु होणार आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींना चौदा दिवसानंतर रक्तदान करता येत असल्यामुळे इच्छिूक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन या निमित्ताने विजयसिंह पंडित यांनी केले. तालुक्यातील गरजु रुग्णांनी या अभियानाचा जास्तित जास्त लाभ घेवुन निरोगी बीड अभियान यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गरजु रुग्नांपर्यत ही योजना पोहचविण्याचे काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version