Site icon लोकाशा-बंब न्यूज

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून मराठवाडास्तरीय अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी मोफत तपासणी शिबीर,ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार उद्घाटन, महिनाभर चलणार्‍या शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा-आ.संदिप क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्यातील हृदयरोग रूग्णांसाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी या मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. महिनाभर चालणार्‍या मराठवाडास्तरीय या महाआरोग्य शिबीराचा गरजु रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन काकू-नाना मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक आ.संदिप क्षीरसागर, संचालक डॉ.बालाजी जाधव, संचालक अजित वरपे यांनी केले आहे. बुधवार दि.21 जुलै रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल व स्व.मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट जालना रोड बीड येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आ.प्रकाश सोळंके, राष्ट्रवादीचे नेते माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, अशोक डक, जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसट, बजरंग सोनवणे, डॉ.नरेंद्र काळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र क्षीरसागर, अ‍ॅड.डी.बी.बागल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जि.प.चे सीईओ अजित कुंभार, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे आदी प्रमुख मान्यवर असणार आहेत. दि.21 जुलै पासून दि.21 ऑगस्ट 2021 पर्यंत मराठवाड्यातील हृदय रूग्णांची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व इतर मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. महिनाभर चलणार्‍या या महाआरोग्य शिबीराचा गरजुवंतांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदिप क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे. चौकटरूग्णांचा उर्त्स्फुत प्रतिसादराज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने हृदयरोग रूग्णांसाठी अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी मोफत तपासणी करण्यासाठी काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट बीड येथे ज्ञानेश कुलकणी मो.9066367777, विष्णु चोले मो.7218734243 यांच्याकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर 200 पेक्षा अधिक रूग्णांनी नोंदणी केली असून आजपासून रूग्णांवरती उपसार सुरू आहेत.चौकटसंकल्प निरोगी बीड अभियानही सुरूआ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या संयोजनातून बीडमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात संकल्प निरोगी बीड अभियान राबविण्यास सुरू करण्यात आली आहे. गर्भ सुरक्षा अभियान, गरोदर माता तपासणी उपचार, लसीकरण, रक्तदान शिबीर, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप, जिभेवरील शस्त्रक्रिया, रक्तदाब, मधुमेह तपासणी आदी आरोग्य संदर्भातील शिबीरे यात घेतली जाणार आहेत.

Exit mobile version