Site icon लोकाशा-बंब न्यूज

ना.अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र नारायणगड येथे शिवाजी महाराजांच्या हस्ते वृक्षारोपण, आ.संदिप क्षीरसागरांची उपस्थिती

तीबीड (प्रतिनिधी):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री क्षेत्र नारायणगड परीसरात गडाचे महंत ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आ.संदिप क्षीरसागर यांच्या संयोजनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र नारायणगड येथे गडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आ.संदिप भैय्या क्षीरसागर, बबन बापु गवते, पंचायत समितीच्या सभपाती सौ.सारीकाताई बळीराम गवते, बळीराम गवते, माऊली सानप, भाऊसाहेब डावकर, महादेव उबाळे, सचिन शेळके, पंकज बाहेगव्हाणकर, जीवन जोगदंड, अप्पा इंदुरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

कोरानाचे संकट लवकर दूर व्हावे; आ.संदिप क्षीरसागरांचे साकडेबीड जिल्ह्याची धाकडी पंढरी असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड येथे जावून आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाचे व नगद नारायणाचे दर्शन घेत आ.संदिप क्षीरसागर यांनी कोरोना महामारीचे संकट लवकर दुर व्हावे असे साकडे घातले. अखंड वारकर्‍यांचा सण गेल्या दोन वर्षापासून साजरा होत नाही याचं दु:ख आहे असं म्हणत बा विठ्ठला लवकर हे संकट दूर कर अशी प्रार्थना ही त्यांनी केली. 

Exit mobile version