Site icon लोकाशा-बंब न्यूज

1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र; महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये 1 ऑगस्टपासून सुरु होईल प्रवेश


दिल्ली, दि.१७ (लोकाशा न्यूज) : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 2021-22 च्या सत्रासाठी अॅकेडमिक कॅलेंडर आणि परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. सर्व महाविद्यालयांना 31 ऑगस्ट 2021 पूर्वी अंतिम वर्ष आणि सेमिस्टर परीक्षा पुर्ण कराव्या लागणार आहे. यूजीसीने नवीन प्रवेशासंदर्भांत सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांना तसे निर्देश दिले आहेत.
मार्गदर्शक सुचनांनुसार, 2021 मध्ये पदवीधर प्रवेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. यानुसार, प्रवेश प्रक्रियेची सुरुवात सीबीएससी, आयसीएसई आणि इतर स्टेट बोर्डच्या 12 वीचा निकाल लागल्यानंतर 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यासोबतच नवीन सत्राची सुरुवात 1 ऑक्टोबर 2021 पासून केली जाईल. यूजीसीने सर्व विद्यापीठांना प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. रिकाम्या जागा भरण्यासाठी 31 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. जर काही कारणास्तव कोणत्याही बोर्डाचा 12 वीचा निकाल लागायला उशीर झाला तर नवीन सत्राची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून केली जाईल.

Exit mobile version