अंबाजोगाई, दि. 16 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे आणि केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नाने केज तालुक्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून एकूण 11 कोटी 70 लाख रुपयांचा दोन रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच होणार्या या नवीन रस्त्यांमुळे या भागातील ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे.
केज तालुक्यातील सांगवी (सारणी)- बेलगाव – केळगाव ते राज्यरस्ता (क्र. 222) आणिपलीि; चंदनसावरगाव – कळंबआंबा – आडस या दोन्ही रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी असून या भागातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी दोन्ही रस्त्यांच्या कामाची मागणी केली होती. खा. प्रीतमताई मुंडे यांनीही या मागणीचा पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून या दोन्ही रस्त्याच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यात सांगवी (सारणी) – बेलगाव – केळगाव ते राज्यरस्ता (क्र. 222) या रस्त्याच्या कामासाठी 7 कोटी 10 लाख रुपये तर चंदनसावरगाव – कळंबआंबा – आडस या रस्त्यासाठी 4 कोटी 60 लाख रुपयांच्या रस्त्याच्या समावेश आहे. सदर रस्त्यांच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असून या भागातील ग्रामस्थांनी केलेली रस्ते बांधकामाची मागणी आता पूर्णत्वास जाणार आहे. एकूण 11 कोटी 70 लाख रुपयांचा या दोन रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाल्याने बेलगाव, केळगाव, सांगवी सारणी, चंदनसावरगाव कळंबआंबा, आडस परिसरातील ग्रामस्थांनी खा. प्रीतमताई मुंडे व आ. नमिता मुंदडा याचे आभार मानले आहेत.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केज मतदार संघात साडे अकरा कोटींचे रस्ते मंजूऱ, खा. प्रीतमताई मुंडे आणि आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश
