Site icon लोकाशा-बंब न्यूज

मारहाण झालेल्या ‘त्या’ महिलेला न्याय देण्यासाठी अ‍ॅड. प्रज्ञा खोसरेंनी ठाण्यात मांडली ठाण, प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी केले तात्काळ गजाआड


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : वंचितांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वय अ‍ॅड. प्रज्ञा खोसरे ह्या नेहमीच प्रयत्नीशील असतात. रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार त्या धडाडीने काम करीत आहेत. त्याअनुषंगानेच दिंद्रुड येथे मारहाण झालेल्या एका महिलेला तात्काळ न्याय देण्यासाठी अ‍ॅड प्रज्ञा खोसरे यांनी थेट दिंद्रुड पोलिस ठाणे गाठून त्या ठिकाणी ठाण मांडली. त्यानुसार पोलिसांनीही या प्रकरणातील आरोपींना तात्काळ गजाआड केले.
बीड जिल्ह्यातील दिंद्रुड या गावी शेतात काम करणार्‍या महिलेकडे एका विकृताने शरीरसुखाची मागणी केली तिने विरोध केला असता तिला मारहाण करण्यातं आली, तिच्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आली, त्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसल्या. त्या आरोपींना तात्काळ अटक व्हावी, तात्काळ पोलिसांनी अ‍ॅक्शन घेऊन चार आरोपींना अटक केली आणि दोन आरोपींना लवकरात लवकर अटक करणार आहेत, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वयक अ‍ॅड प्रज्ञा सुदाम खोसरे, अनिता ताई वाघमारे (कार्याध्यक्ष बीड) सुनीताताई नेटके आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी दिंद्रुडच्या पोलिसांच्या कामाचे यावेळी त्यांनी आभार मानले.

Exit mobile version