Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजा मुंडेंना मोठा झटका; साखर कारखान्याचे बँक खाते सील

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. बँक खाते सील करुन पीएफच्या थकबाकी 1 कोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे. ही कारवाई म्हणजे पंकजा मुंडे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांत विरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. परळी वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली होती.परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्थापनेची मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली.

संचालक मंडळाचे स्पष्टीकरण
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.
दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि शेतकऱ्यांचं भवितव्य धोक्यात आणणं हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नाही असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडेंना एकामागे एक झटके
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे याची बहिण आणि खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राजीनामे सत्र सुरू केले होते. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.

Exit mobile version