अंबाजोगाई दि .11 : डीवायएसपी सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आबासाहेब पांडे या दूतामार्फत पाठवलेल्या संदेशावर आंदोलन कर्त्यांनी विचार विनिमय केला . व जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, मात्र ते पुन्हा अंबाजोगाईमध्ये आल्यास ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करु असा इशारा दिला . रविवारी ( दि .11 ) रात्री हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले .
विनयभंग आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले डॉ.सुहास यादव यांचा शोध घेताना चौकशी करण्यासाठी म्हणून स्वतः डीवायएसपी सुनील जायभाये यांनी मंगळवारी 6 जुलै रोजी रात्री त्यांचे चुलत भाऊ विलास यादव यांना प्रशांतनगर भागात गाठले . तिथे जायभाये यांनी विलास यादव यांना अर्वाच्च भाषेत जातीवरून शिवीगाळ करत मारहाण केली , कुटुंबाबाबतही आक्षेपार्या भाषा वापरली असे क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे . त्यानंतर यादव यांना पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली . मराठा क्रांती मोर्चाचा काही कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर यादव यांची सुटका करण्यात आली . या घटनेचे पडसाद बुधवार पासून उमटण्यास सुरूवात झाली . विलास यादव यांना चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण व जातीवाचक अर्वाच्च शिवीगाळ करणारे डीवायएसपी जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने बेमुदत ठिय्या आंदोलनातून सुरू केली . ते सलग पाचव्या दिवशी रवीवारीही सुरूच होते . या पाच दिवसात आंदोलन कर्त्याला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातुन व बाहेरून अनेक मान्यवर व शेकडो नागरीक अंबाजोगाईमध्ये आले . आंदोलन का सोबत चर्चा करण्यासाठी आयजी प्रसन्ना अंबाजोगाईत आले . चर्चा झाल्या नंतर त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना या प्रकरणाची निपक्षः पाती पणे चौकशी करून आपला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले . या आदेशा नंतरही काल पाचव्या दिवशी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच होते . त्या मुळे डीवायएसपी सुनील जायभाय यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आबासाहेब पांडे या दूता मार्फत सायंकाळी प्रस्ताव पाठवला . या वेळी आंदोलन कर्त्यासोबत चर्चा करण्यासाठी आ.संजय दौंड , अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर , उपविभागीय अधिकारी शरद झाडके , दत्ता पाटील , बबन यवर होते . या वेळी पालकमंत्री महादयाना पाठवलल्या संदेशावर ॲड.संतोष लोमटे , वैजनाथ देशमुख , प्रशांत अदनाक , देशमुख या आंदोलन कर्त्यांनी विचार करून सर्व आंदोलन कर्त्याच्या वतीने अॅड.माधव जाधव यांनी सुनील जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवा , या दरम्यान त्यांची बदली , निलंबन करा मात्र ते पुन्हा अंबाजोगाई मध्ये आले नाही पाहिजेत . असा इशारा देत जर करता ते तर पुन्हा अंबाजोगाईमध्ये आले तर आम्ही ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करू असा इशारा त्यांनी दिला . रविवारी रात्री हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले . या आंदोलकांसोबत पंकजाताई मुंडे तसेच भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनीही पाठींबा दर्शवला होता.