Site icon लोकाशा-बंब न्यूज

आंतररष्ट्रीय अभ्यासात बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या नियोजनाचे धडे


बीड -पावणे दोन वर्षापासून देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. पहिल्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यातील कोरोनाचं नियोजन तत्कालीन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं केलं होतं. या नियोजनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. न्युयॉर्क येथील कोलंबिया स्कुल ऑफ इंटरनॅशनल अ‍ॅण्ड पब्लिक अफेअर्सच्या माध्यमातून आता आतंरराष्ट्रीय आभ्यासाचा विषय झाला आहे.
गेल्या मार्च महिन्यामध्ये कोरोनाची लागण होण्यास सुरूवात झाली होती. याचं चोख नियोजन करण्याचं काम बीडचे तत्कालीन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी केले होते. विशेष म्हणजे जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी जिल्हाबाहेर गेलेले 70 हजार ऊसतोड कामगार एप्रिल,मे मध्ये परतले. या मजुराच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी 6 जिल्ह्यांना भिडणार्‍या सिमावर 300 हून अधिक अंतर जिल्हा रस्ते शोधून ते सील करण्यात आले होते. जागोजागी परतणार्‍या ऊसतोड मजुरासाठी तालुकास्तरावर मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांना या बाबतच्या नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कॉन्टॅक्ट ट्रेसींग मार्फत 350 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबासाठी क्युआर कोड युक्त पास तसेच त्यांच्या मदतीसाठी पोलीसांचा चमु व 24 तास सेवा पुरवली जात होती. त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. जगातील सर्व श्रेष्ठ विद्यापीठापैकी एक असलेल्या कोलंबिया स्कुल ऑफ इंटरनॅशनल अ‍ॅण्ड पब्लिक अफेअर्सच्या माध्यमातून हा विषय अभ्यासासाठी घेण्यात आला आहे. हर्ष पोद्दार हे सध्या आमरावती येथील राज्य राखीव पोलीस दलाचे प्रमुख आहे.

Exit mobile version