Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुंडे भगिनींवरील अन्याय आम्ही खपवून घेणार नाहीत,- संतोष हंगे यांनीही दिला पदाचा राजीनामा

बीड,
केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांचा समावेश होणे क्रमप्राप्त होते परंतु राज्य पातळीवर काही नेते पंकजाताई आणि प्रीतमताईंचे जाणीवपूर्वक राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सहाजिकच पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या नेत्यांना अशा प्रकारे डावलने सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या मनाच्या विरुद्ध आहे तसेच आम्हाला जि.प. च्या निवडणुकीत मतदान करून जि.प.मध्ये पाठवणाऱ्या मतदारांचेही हेच मत आहे. तसेच आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मा.पंकजाताईच्या व प्रीतमताईच्या एका सभेवर हजारो मतांचा आशीर्वाद लोक देतात, अशा लोकनेत्यांवर अन्याय होत असेल तर अशा पक्षात राहणे योग्य नाही म्हणून मी आपल्या जि.प.सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोष हंगे म्हटले आहे.

Exit mobile version