बीड, केंद्रीय मंत्री मंडळात खा. प्रीतमताई मुंडे यांना सामावून घेतलं नसल्याने नाराज मुंडे समर्थकांकडून भाजपमधील पदाचा राजीनामा सत्र सुरू केला आहे. पक्षातील काही नेते जाणून बुजून मुंडे भगिनींना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळेच काल भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, त्यांच्यानंतर युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आताप्रयत्न 20 जणांनी भाजपच्या पदाचे राजीनामे फेकले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे हे राजीनामे देण्यात आली आहेत, यामध्ये नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याही समावेश आहे.
मुंडे भगिनींवर अन्याय होत असल्याने बीडमध्ये भाजपच्या 20 जणांनी राजीनामे फेकले, राजीनाम्यात नगरसेवक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्याचांही समावेश
