Site icon लोकाशा-बंब न्यूज

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ‘या’ एकमेव महिला खासदाराचा समावेश

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion)आज होणार आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील एकमेव महिला खासदार डॉ. भारती पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी प्रितम मुंडे यांना हे पद मिळण्याची शक्यता होती. मात्र ही शक्यता आता हुकल्याचं म्हटलं जात आहे.
डॅा भारती पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. महाराष्ट्रातून एकमेव महिला केंद्रीय मंत्रीमंडळा जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. डॉ भारती पवार हे नाव अचानक चर्चेत आलं.

Exit mobile version