Site icon लोकाशा-बंब न्यूज

मोदींच्या कॅबिनेटचा विस्तार 7 जुलैला: 22 नवीन मंत्री घेऊ शकतात शपथ;डॉ. प्रितम मुंडे आणि पुनम महाजन यांचे नाव चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार मोदी 2.0 चा पहिला विस्तार बुधवारी सकाळी 11 वाजता होईल. सध्या मंत्रिमंडळात 28 मंत्री पदे रिक्त आहेत आणि 17-22 खासदार मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात असे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन दिवस चर्चा केली आहे.

यूपी-बिहार-महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून बनतील मंत्री
महाराष्ट्र : महाराष्ट्रातून भाजपच्या खासदार हिना गावीत यांना केंद्रीय मंत्री बनवले जाऊ शकते. त्यांच्या व्यतिरिक्त भूपेंद्र यादव,प्रीतम मुंडे आणि पूनम महाजन यांचे नावही चर्चेत आहे.

मध्य प्रदेश
राज्यात भाजपचे सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे ज्योतिरादित्य सिंधिया मोदी कॅबिनेटचा नवीन युवा चेहरा बनू शकतात. या व्यतिरिक्त जबलपूर येथून भाजपच खासदार राकेश सिंह यांचे नावही आहे. मध्य प्रदेशातून 1-2 नावांची चर्चा कॅबिनेट विस्तारासाठी आहे.

बिहार : लोजपाचे खासदार पशुपति कुमार पारस आणि JDU चे आरसीपी सिंह यांना मंत्री बनवले जाऊ शकते. बिहार येथून 2-3 नावांची चर्चा आहे.

उत्तर प्रदेश : अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्या महिन्यात अनुप्रिया यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. त्यांच्याखेरीज वरुण गांधी, रामशंकर कठेरिया, अनिल जैन, रीता बहुगुणा जोशी, जफर इस्लाम यांच्या नावांचीही चर्चा आहे.

3 माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही केंद्रात मंत्री केले जाऊ शकते. तीरथसिंग रावत यांनी दोन दिवसांपूर्वीच 3 जुलै रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. याखेरीज लडाखचे भाजप खासदार जामांग नामग्याल, उत्तराखंडचे अजय भट्ट किंवा अनिल बलुनी, कर्नाटकचे प्रताप सिन्हा, पश्चिम बंगालचे जगन्नाथ सरकार, हरियाणामधून शंतनू ठाकूर किंवा निसिथ प्रामणिक, राजस्थानचे राहुल कास्वान, ओडिशाचे अश्विनी वैष्णव , दिल्ली शपथ घेणाऱ्यांमध्ये परवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी यांची नावेही असू शकतात.

थावरचंद गेहलोत यांना काढून टाकले जाऊ शकते
सध्या मध्य प्रदेशातील मोदी मंत्रिमंडळात 4 मंत्री आहेत. नरेंद्रसिंग तोमर, प्रह्लाद पटेल, थावरचंद गहलोत आणि फाग्गनसिंग कुलस्ते. कुलस्ते किंवा थावर चंद यांना एकतर मंत्रिमंडळातून काढून टाकले जाऊ शकते. अधिक चर्चेत आहेत 73 वर्षीय ठावर चंद यांचे नाव, जे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात सतत सदस्य राहिले आहेत.

Exit mobile version