बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : कौटुंबिक कारणास्तव जिल्हाधिकरी रवींद्र जगताप हे रजेवर आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे, 2 जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. बीडमध्ये रुजू झाल्यापासून रवींद्र जगताप यांनी एकही सुट्टी घेतली नव्हती, या दरम्यानच्या काळात प्रत्येकाला न्याय देण्याचे काम त्यांनी खऱ्या अर्थाने केले,आता कौटुंबिक कारणास्तव त्यांनी रजा घेतली आहे, त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे सोपविला असून त्यांनीही 2 जुलै रोजी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार तुषार ठोंबरेंकडे
