Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात लसीकरणाला मिळणार गती, पंचेवीस हजार डोस आले, पंधरा हजार कोविडशिल्ड तर 9700 कोवॅक्सिनच्या डोसचे वितरण – डीएचओ राधाकिसन पवार यांची माहिती


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यात येत्या काळात लसीकरणाला प्रचंड गती मिळणार आहे. कारण जिल्ह्यासाठी आणखी 24700 डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये पंधरा हजार डोस कोविडशिल्ड तर 9700 डोस हे कोवॅक्सिनचे आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. त्यामुळेच जिल्ह्यात गतीने लसीकरण झाले पाहिजे, असा प्रयत्न जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांचा आहे, त्याअनुषंगानेच त्यांच्या नेतृत्वात गतीने लसीकरण केले जात आहे. मागील दोन दिवस लस उपलब्ध नव्हती, त्यामुळे लसीकरण थांबले होते. मात्र बुधवारी जिल्ह्याला तब्बल 24 हजार 700 लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. यापैकी पंधरा हजार कोविडशिल्ड तर 9700 डोस हे कोवॅक्सिनचे आहेत, या 24700 डोसमुळे जिल्ह्यात लसीकरणाला आणखी गती येणार आहे.

Exit mobile version