अंबाजोगाई, दि. 27 (लोकाशा न्युज) : लसीकरणाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान आहे. आज वाडी वस्त्यांवर ही सुरू असलेले लसीकरण हे केंद्रसरकारचे मोठे यश आहे. अशा शब्दात खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी पंतप्रधान यांच्या कार्याचा गौरव केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ठरलेला मन की बात हा कार्यक्रम रविवारी अंबाजोगाई च्या विलासराव देशमुख सभागृहात सार्वजनिक प्रक्षेपन करून ठेवण्यात आला होता.बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे व आ.नमिता मुंदडा यांनी या कार्यक्रमाचा आनंद उपस्थित भाजपा कार्यकर्त्यां सोबत घेतला. व उपस्थित कार्यकर्त्यांशी त्यांनी मनमोकळी चर्चा केली. केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना साथीच्या सर्व नियमांचे पालन करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा प्रबोधनपर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण ठेवण्यात आले होते.खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अंबाजोगाई येथे हा उपक्रम पार पडला. याप्रसंगी भाजपा चे युवा नेते अक्षय मुंदडा,माजी जि. प.सदस्या गयाबाई कर्हाड,भाजपा चे तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे, भाजपा चे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्यासह भाजपा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खा.डॉ.मुंडे म्हणाल्या की केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने सर्वच राज्यांना मोठी मदत दिली आहे.भविष्यात तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे सांगून त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. या प्रसंगी बोलताना आ.नमिता मुंदडा म्हणाल्या की जिल्ह्याची मोठी व्याप्ती असतानाही प्रीतमताई यांनी कोरोनाच्या काळात जिल्यातील सर्व रुग्णालयास भेटी देऊन रुग्णांना दिलासा दिला.मतदार संघात निर्माण होणारे प्रश्न व समस्या निराकरण करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय मुंदडा यांनी केले. संचलन वैजनाथ देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार अँड. संतोष लोमटे यांनी मानले.या वेळी रमाकांत मुंडे, मधुकर कचगुंडे,नगरसेवक सारंग पुजारी,खालील मौलाना,शेख ताहेर,बालासाहेब पाथरकर,अनंत लोमटे,कल्याण काळे,प्रशांत आदनाक,अनंत अरसुडे,अमोल पवार,योगेश कडबाने यांच्यासह भाजपा चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.