Site icon लोकाशा-बंब न्यूज

देशात कोरोना, बेरोजगारी, आरोग्याच्या प्रचंड अडचणी, तरी एजन्सीचा गैरवापर करत सूडाच्या राजकारणात व्यस्त – सुप्रिया सुळे

पुणे , २५ जून | एजन्सीचा गैरवापर हे त्यांचं स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसतं आहे . मागील अनेक वर्षात त्यांची सत्ता आल्यापासून आम्ही जवळूवन पाहिलेलं आहे . शरद पवारांना देखील ईडीची नोटीस पाठवली गेली होती , त्यामुळे हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे . ” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज म्हटलं . राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवसास्थानी ईडीने आज छापेमारी केली , त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली .

आमचं राजकारण हे प्रगतीचं राजकारण आहे . आम्ही लोकांची सेवा करण्यात व्यस्थ आहोत . तिसरी लाट कधी येईल याची चर्चा होईल . आता 24 तास महाविकास आघाडी तिसरी लाट रोखण्यात , त्याच्या उपाय योजनांमध्ये व्यस्थ आहे , असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. वैयक्तिक सूड घेण्याचा आमचं धोरण कधीही नव्हतं आणि कधीही असणार नाही . असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं . याचबरोबर , एखादा मोठा पक्ष या देशात करोना , बेरोजगारी आरोग्याच्या एवढ्या अडचणी असताना , सूडाचं राजकारण करतोय , हे अतिशय दुर्दैवी आहे . असं सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलून दाखवलं .

Exit mobile version